Pickle Making : लोणचं खराब होऊ नये म्हणून वापरा या ट्रिक्स

Team Agrowon

भारतामध्ये विविध प्रकारचे मसाले उपलब्ध असतात. वर्षभर विविध फळांचा हंगाम असल्याने वर्षभर लोणचे तयार करता येते.

Pickle Making | Agrowon

लोणच्यामध्ये जास्त मसाला वापरल्यास किंवा त्याच्या सानिध्यात जास्त वेळ शिजवल्यास आणि जास्त तीव्रतेच्या शिरक्यामध्ये भाजी किंवा फळे मुरविल्यास कडवटपणा येतो.

Pickle Making | Agrowon

मीठ किंवा लोणच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यास लोणचे काळे पडते. - काही विशिष्ट बुरशीची वाढ झाल्याने लोणचे काळे पडते.

Pickle Making | Agrowon

मिठाच्या द्रावणामध्ये भाज्या किंवा फळे पूर्णपणे न बुडविल्यास किंवा द्रावणाची तीव्रता आवश्यकतेपेक्षा कमी पडल्यास फोडी रंगाने फिक्या, मऊ पडतात किंवा बुळबुळीतपणा येतो.

Pickle Making | Agrowon

मुरण्याची क्रिया चालू असताना मिठाच्या द्रावणाच्या पृष्ठभागावर यीस्टची वाढ होऊन मळी तयार होते. या मळीमुळे किण्वन क्रिया व्यवस्थित होत नाही.

Pickle Making | Agrowon

लॅक्टिक वर्गातील जीवाणूंच्या बरोबर लोणचे खराब करणाऱ्या जिवाणूंचा संसर्ग लोणच्यामध्ये होतो. अशा पद्धतीची मळी तयार होताच त्वरित काढून टाकावी. मिठाच्या द्रावणात काही प्रमाणात शिरका मिसळावा, त्यामुळे यीस्टचा प्रादुर्भाव टळतो.

Pickle Making | Agrowon

ताजी फळे,भाजी वापरावी. निर्मितीसाठी वापरावयाची सर्व साधने, भांडी निर्जंतुक असावीत. शक्य असल्यास सर्व भांडी आणि बरण्या गरम पाण्याने निर्जंतुक कराव्यात.

Pickle Making | Agrowon

वापरण्यात येणारे मसाले चांगल्या प्रतीचे आणि भेसळ विरहित असावेत. साठविण्यासाठी चीनी मातीच्या बरणीचा वापर करावा.

Pickle Making | Agrowon

Mango Ripening : रंग, चव एकसारखी येण्यासाठी आंबे पिकविण्याची घरगुती पद्धत

आणखी पाहा...