Swarali Pawar
मुसळधार पावसाचा किंवा पूराचा इशारा असल्यास जनावरे नदीपात्र व नाल्यांपासून दूर, उंच जागी हलवावे. जनावरांना नदीपात्राजवळ चरण्यास सोडू नका.
पुरेशा प्रमाणात वैरण साठवा आणि ती कोरड्या व सुरक्षित जागी ठेवावे. साठवलेल्या खाद्याला बुरशी लागली नसल्याची खात्री करूनच जनावरांना द्यावी.
गोठ्यातील विद्युत तारा, उपकरणे आणि कडबाकुट्टी मशीन सुरक्षित असल्याची खात्री करावी. मोकळ्या तारांना स्पर्श होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी.
जनावरांना वेळेवर जंतनाशक औषधे द्यावीत. घटसर्प व फऱ्या रोगासाठी लसीकरण करावे. गोठा स्वच्छ, कोरडा व हवेशीर ठेवावी. गोचीड, गोमाशी टाळण्यासाठी निरगुडी, तुळस किंवा गवती चहा पानांच्या पेंडी बांधाव्यात.
पूरस्थितीत जनावरांना दावणीस बांधू नका; त्यांना मोकळे सोडावे, कारण जनावरे नैसर्गिकरित्या पोहू शकतात. जनावरांमध्ये दाटीवाटी टाळावी आणि पुरेसे अंतर ठेवावे.
गोठ्यात ओल्या ठिकाणी जनावरांना बांधू नका. जनावरांसाठी स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध ठेवावे. वाळलेले गवत जाळल्याने होणारा धूर जनावरांना त्रासदायक ठरू शकतो, त्याची काळजी घ्यावी.
मृत जनावरांची विल्हेवाट पाण्याचा स्रोत, नदीपात्र आणि सार्वजनिक ठिकाणांपासून दूर लावावी. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावी आणि स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.
पूर, अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरांचे नुकसान झाल्यास शासन आर्थिक साह्य देते. यासाठी पंचनामा, शवविच्छेदन अहवाल व इतर कागदपत्रे महसूल विभागाकडे जमा करावे.