Swarali Pawar
या अळ्या पानांवर सुरुवातीला लहान छिद्रे पडतात, नंतर पूर्ण पाने कुरतडली जातात. कामगंध सापळे लावा, नोमोरिया रिलाई ४० ग्रॅम / १० लि. पाणी फवारणी करा किंवा प्रोफेनोफॉस, फ्लुबेंडामाईड यांसारखी औषधे वापरावीत.
या अळीमुळे शेंगांवर गोल छिद्रे पडतात, आतील दाणे अर्धवट खाल्लेले दिसतात. पक्षी थांबे, कामगंध सापळे बसवा, नोमोरिया रिलाई किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल, एंडोक्झाकार्ब यांची फवारणी करावी.
खोडमाशी खोडात शिरून गर खाते, त्यामुळे खोड कमजोर होऊन झाड वाकते किंवा वाळते. क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल २.५ मि.ली. / १० लि. पाणी मिसळून फवारणी करा व पिकाचे नियमित निरीक्षण करावे.
गोगलगायी कोवळ्या पानं, देठ कुरतडतात, झाडाची वाढ थांबते. दाणेदार मेटाल्डिहाईड २ किलो/एकर संध्याकाळी शेतात व बांधावर पसरवावी.
तांबेरामुळे पानाखाली तपकिरी पुरळ दिसतात, पाने पिवळी पडून गळतात. हेक्झाकोनॅझोल, प्रोपीकोनॅझोल, क्रिसॉक्झिम मिथाईल १० मि.ली./१० लि. पाणी फवारणी करावी.
या रोगामुळे खोडाजवळ बुरशी वाढते, झाड सुकते, लहान रोपे पटकन मरतात.
व्यवस्थापनासाठी रोगट झाडे उपटून नष्ट करावेत, कार्बेन्डाझिम १० ग्रॅम / १० लि. पाणी फवारणी करावी व पाण्याचा निचरा चांगला ठेवावी.
पानांवर तपकिरी व काळपट गोल ठिपके पडतात, पाने गळतात आणि उत्पादन कमी होते. उपाययोजना म्हणून पायरॅक्लोस्ट्रोबीन, टेब्युकोनॅझोल किंवा सल्फरयुक्त औषधे १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
करप्यामुळे पानांवर अनियमित तपकिरी डाग पडून पाने व शेंगा करपतात, दाणे सुरकुततात. नियंत्रणासाठी टेब्युकोनॅझोल + सल्फर २५ ग्रॅम / १० लि. पाणी किंवा ट्रायकोडर्मा ४ किलो/एकर आळवणी करावी.