Swarali Pawar
शेडमध्ये पावसाचे पाणी येऊ नये याची काळजी घ्या. पन्हाळे ३-४ फूट ठेवा व पडदे लावा. ओला भाग तात्काळ कोरडा करा.
पावसाळ्यात आर्द्रता वाढते. शेडमध्ये फॅन लावा किंवा थंडी असल्यास बल्ब/हिटर वापरा. अंड्यांच्या कोंबड्यांसाठी उबदारपणा महत्त्वाचा.
ओले झालेले तूस काढून टाका व नवे कोरडे तूस टाका. ओल्या भागावर सुपर फॉस्फेट किंवा सोडियम बेंटोनाइट टाकल्याने कोरडेपणा येतो.
ओल्या गादीतून माशांचा त्रास वाढतो. किटकनाशकाची फवारणी करून माशांवर नियंत्रण मिळवा.
कोंबड्यांचे खाद्य कोरड्या व हवेशीर ठिकाणी ठेवा. बुरशी लागलेले, ओलसर किंवा गुठळ्या झालेले खाद्य कधीही देऊ नका.
कोंबड्यांना नेहमी स्वच्छ व सुरक्षित पाणी द्या. खाद्य व पाण्याची भांडी दररोज स्वच्छ ठेवा.
पावसाळ्यात रोगांचा धोका जास्त असतो. एक दिवस आड शेडमध्ये निर्जंतुकीकरण करा व आजारी पक्षी वेगळे ठेवा.
कोंबड्यांचे वेळापत्रकानुसार लसीकरण सुरु ठेवा. रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे द्या जेणेकरून रोग टाळता येईल व उत्पादन चांगले राहील.