Swarali Pawar
निम्म्या राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे हळद पिकावर परिणाम झाला आहे. पाण्यामुळे कंदकुजी, करपा रोग आणि वाढ थांबण्याची शक्यता असते.
शेतात पाणी साठले असल्यास त्वरित निचरा होईल अशा प्रकारे व्यवस्था करा. पाणी साचून राहिल्यास कंदकुजीसारखे रोग वाढतात.
पाण्यात बुडालेल्या पानांवर पाण्याची फवारणी करून चिखल धुऊन टाका. यानंतर विद्राव्य खतांची व सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करा.
फवारणी करताना सिलिकॉन स्टिकर वापरल्यास खतांचे परिणाम वाढतात. सूक्ष्म अन्नद्रव्यांची दीड मिली प्रति लिटर पाण्यात फवारणी करा.
कॉपर ऑक्सिक्लोराइड 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी करा. एक टक्का बोर्डो मिश्रणही उपयुक्त ठरते.
फुले सुपर बायोमिक्स किंवा वसंतराव नाईक बायोमिक्स वापरा. फवारणीसाठी 10 मिली/लिटर, आळवणीसाठी 2 लिटर/एकर प्रमाण.
आद्रता आणि ढगाळ हवामानामुळे करपा वाढतो. कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा मॅन्कोझेब 2.5-3 ग्रॅम प्रति लिटर फवारणी करा.
पाण्यात बुडल्याने पांढऱ्या मुळ्यांची वाढ थांबते. यासाठी अन्नद्रव्यांचा वापर करून पुन्हा जोमदार वाढ सुनिश्चित करा.
पावसाची उघडीप झाल्यावर लिंबोळी पेंड २५० किलो/एकर वापरा. इतर खतांबरोबर दिल्यास कंद भरणी चांगली होते.