Swarali Pawar
थंड वारा थेट लागू नये म्हणून गोठ्यात पडदे किंवा कव्हर लावावे. गोठा कोरडा, स्वच्छ आणि बंदिस्त ठेवल्यास जनावरं गारठ्यापासून सुरक्षित राहतात.
लहान वासरे आणि करडे थंडीला जास्त बळी पडतात. त्यांना रात्री बंदिस्त आणि उबदार ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे.
ज्या भागात जास्त थंडी पडते तेथे पिवळे बल्ब, हिटर किंवा उब देणारी साधने वापरावीत. कोंबड्यांसाठी शेड बंद ठेवून उब देणे अत्यंत महत्वाचे असते.
जनावरांना दिवसा उन्हात बांधून ठेवले तर त्यांना व्हिटामिन D3 मिळते. उन्हामुळे जनावरं पाणी पितात आणि चाऱ्याचे पचनही चांगले होते.
थंडीमध्ये जनावरांची ऊर्जा जास्त खर्च होते, त्यामुळे ऊर्जायुक्त खाद्य द्यावे. सरकी पेंड, शेंगदाणा पेंड आणि ओला–सुका चारा संतुलित प्रमाणात द्यावा.
लसीकरणापूर्वी जनावरांचे जंतनिर्मूलन करणे आवश्यक असते. जंत कमी झाल्याने आरोग्य सुधारते आणि दूध उत्पादनातही वाढ होते
थंडीमध्ये FMD आणि इतर रोगांचे संक्रमण वाढते, त्यामुळे लसीकरण करणे गरजेचे आहे. लसीकरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि जनावरं गंभीर आजारांपासून वाचतात.
थंडीपूर्वी आणि थंडीमध्ये रोगप्रतिकारक औषधांचा नियमित कोर्स द्यावा. यामुळे जनावरांची प्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि उत्पादन स्थिर टिकते.