Swarali Pawar
फेब्रुवारी-मार्चपासून तापमान हळूहळू वाढू लागते आणि कोंबड्यांवर उष्णतेचा ताण वाढतो.
यामुळे त्यांच्या आहारात आणि पाण्याच्या व्यवस्थापनात काही बदल करणे गरजेचे असते.
हिवाळ्यात कोंबड्यांना जास्त ऊर्जा लागते, म्हणून ऊर्जायुक्त खाद्य दिले जाते. पण उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे ऊर्जेची गरज कमी होते, त्यामुळे आहार हलका ठेवावा.
कोंबड्यांना रोज ठरलेल्या वेळेतच खाद्य दिल्यास त्यांचे आरोग्य आणि उत्पादन चांगले राहते.
नियमित वेळापत्रकामुळे कोंबड्यांमध्ये ताण कमी राहतो.
उन्हाळ्यात कोंबड्यांच्या आहारातील जास्त ऊर्जा देणारे घटक कमी करावेत. त्याऐवजी प्रथिने देणारे घटक थोडे वाढवावे.
मांसल (ब्रॉयलर) कोंबड्यांच्या खाद्यात ४ ते ५ टक्के वनस्पती तेल वापरू शकता. यामुळे त्यांना आवश्यक ऊर्जा मिळते आणि वाढ चांगली होते.
लेयर कोंबड्यांच्या खाद्यात थोडा खाण्याचा सोडा (सोडियम बायकार्बोनेट) घालणे फायदेशीर ठरते.
कोंबड्यांना खाद्याच्या सुमारे तीनपट पाणी उपलब्ध करून द्यावे. पाण्यात इलेक्ट्रोलाइट आणि व्हिटॅमिन सी दिल्यास कोंबड्या तंदुरुस्त राहतात.
कोंबड्यांना सकाळी किंवा संध्याकाळी खाद्य देणे अधिक योग्य ठरते. दुपारी उष्णतेचा ताण वाढू शकतो.