Livestock Summer Care: कडक उन्हात पशुधन सुरक्षित कसे ठेवावे? जाणून घ्या सोप्या टिप्स

Swarali Pawar

उन्हाळ्यात काळजी

जास्त तापमानामुळे जनावरांची भूक कमी होते आणि दूध उत्पादन घटते. म्हणून उन्हाळ्यात त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Livestock Summer Care | Agrowon

हवामानाचा अंदाज

उष्ण लाट येण्यापूर्वी तयारी करणे महत्त्वाचे आहे. सावली आणि अतिरिक्त पाण्याची व्यवस्था आधीच करावी.

Livestock Summer Care | Agrowon

चरण्यासाठी योग्य वेळ

जनावरांना सकाळी आणि संध्याकाळी चारण्यासाठी सोडा. दुपारच्या कडक उन्हात चरणे टाळावे.

Livestock Summer Care | Agrowon

थंड आणि हवेशीर गोठा

गोठ्याची उंची जास्त ठेवा जेणेकरून हवा खेळती राहील. छप्परावर पांढरा रंग आणि पाचट टाकल्याने उष्णता कमी होते.

Livestock Summer Care | Agrowon

थंड पाण्याची व्यवस्था

जनावरांना दिवसभर स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध असावे. पाण्याचे हौद सावलीत ठेवणे आवश्यक आहे.

Livestock Summer Care | Agrowon

आहाराचे योग्य नियोजन

सकाळी आणि संध्याकाळी चारा देणे अधिक योग्य असते. दुधाळ जनावरांना संतुलित आहार आणि खनिज मिश्रण द्यावे.

Livestock Summer Care | Agrowon

म्हशींची विशेष काळजी

म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. त्यांना थंड पाणी आणि सावलीची व्यवस्था करावी.

Livestock Summer Care | Agrowon

उष्माघाताची लक्षणे

श्वास वाढणे, थकवा किंवा भूक न लागणे ही लक्षणे दिसू शकतात. अशी चिन्हे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा.

Livestock Summer Care | Agrowon

Sugarcane Heat stress: उन्हाळ्यात उसाची वाढ थांबतेय? उत्पादन वाचवण्यासाठी ४ सोपे उपाय

Agrowon
अधिक माहितीसाठी...