Spinach Cultivation: उन्हाळ्यात पालक लागवड, कमी कालावधीत मिळवा भरघोस उत्पादन!

Swarali Pawar

पालक लागवड

पालक हे कमी कालावधीत तयार होणारे आणि बाजारात कायम मागणी असलेले पीक आहे. पाण्याची उपलब्धता असेल तर उन्हाळ्यातही पालक लागवड करून चांगला नफा मिळवता येतो.

Summer Spinach Tips | Agrowon

योग्य जमीन?

पालक पिकासाठी मध्यम काळी आणि पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन योग्य असते. जमिनीत पाणी साचणार नाही याची काळजी घेतल्यास पिकाची वाढ चांगली होते.

Summer Spinach Tips | Agrowon

कोणत्या जाती?

पालक लागवडीसाठी पुसा ज्योती, ऑलग्रीन आणि पुसा हरीत या जाती चांगल्या मानल्या जातात. या जातींची वाढ जलद होते आणि पानांची गुणवत्ता देखील चांगली असते.

Summer Spinach Tips | Agrowon

बियाणे किती?

पालक लागवडीसाठी हेक्टरी साधारण ८ ते १० किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाण्याला थायरमची प्रक्रिया केल्यास उगवण चांगली होते.

Summer Spinach Tips | Agrowon

पेरणी कशी?

पेरणी करताना ३ × २ मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. दोन ओळींमध्ये सुमारे १५ सेंमी अंतर ठेवून पेरणी करावी.

Summer Spinach Tips | Agrowon

खत व्यवस्थापन?

लागवडीपूर्वी प्रति हेक्टरी १० ते १२ टन शेणखत जमिनीत मिसळावे. तसेच नत्र, स्फुरद आणि पालाश माती परीक्षणानुसार द्यावे.

Summer Spinach Tips | Agrowon

कालावधी किती?

पालक पीक साधारण ९० ते ११५ दिवसांत तयार होते. योग्य व्यवस्थापन केल्यास पिकाची वाढ चांगली होते.

Summer Spinach Tips | Agrowon

किती उत्पादन?

पालक पिकातून प्रति हेक्टरी साधारण १५ ते २० टन उत्पादन मिळू शकते. वेळेवर कापणी केल्यास बाजारात चांगला दर मिळण्याची शक्यता वाढते.

Summer Spinach Tips | Agrowon

Pomegranate Issue: डाळिंब बागेत फुलगळ का होते? शेतकऱ्यांनी ओळखावीत ही मुख्य कारणे

अधिक माहितीसाठी...