Buffalo Care: म्हशींचे आरोग्य कसे राखाल?

Swarali Pawar

लसीकरण

पावसाळ्यापूर्वी घटसर्प आणि फऱ्या प्रतिबंधक लस द्यावी. ब्रुसेल्लोसीस लस फक्त ४ ते १२ वर्षांच्या माद्यांना द्यावी.

Vaccination to Buffalo | Agrowon

कासेचे आजार

म्हशींचे स्नायू बळकट असल्याने दोहनानंतर सडाची रंध्रे पटकन बंद होतात. यामुळे म्हशींमध्ये कासेचे आजार कमी प्रमाणात दिसतात.

Diseases of Buffalo | Agrowon

पान्हा चोरी उपाय

पान्हा चोरी होत असल्यास ऑक्सीटोसीन इंजेक्शन टाळा. त्याऐवजी वनस्पतीजन्य नैसर्गिक उपायांचा वापर करा.

Buffalo and baby Buffalo | Agrowon

आहार व पचन

शेण तपासून पचन कार्य व्यवस्थित आहे का हे ओळखता येते. योग्य पचन झाल्यासच आर्थिक फायदा अधिक मिळतो.

Food and Digestion | Agrowon

प्रसूती व आरोग्य

गर्भपात, दुग्धज्वर, किटोसीस यांसारख्या आजारांसाठी वेळेवर उपाय करावेत. प्रसूतीपूर्वी व नंतर पशुवैद्यकाचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.

Pregnancy Health | Agrowon

पाय, खुरे व जखमा

पायाच्या जखमा, लंगडणे व खुरातील समस्या दूध उत्पादन कमी करतात. खुरे वेळोवेळी कापून योग्य उपचार करावेत.

Hoofs care | Agrowon

स्वच्छता व तपासणी

डोळे, कान, शरीर आणि गोठ्याची स्वच्छता नियमित ठेवावी. दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी करून योग्य प्रतिबंधक उपाय करावेत.

Cleanliness checking | Agrowon

पशुधनाचा सल्ला

नियमित लसीकरण, आहार व्यवस्थापन आणि स्वच्छतेमुळे म्हशी निरोगी राहतात. योग्य काळजी घेतल्यास दूध उत्पादन वाढते आणि नफा अधिक मिळतो.

Livestock management | Agrowon

Hoof Health: खुरांच्या आरोग्यासाठी आहाराचे ९ सुवर्णनियम

Hoofs care | Agrowon
अधिक माहितीसाठी...