Anuradha Vipat
पांढरा शर्ट हा प्रत्येक स्त्री आणि पुरुषाच्या कपाटातील सर्वात महत्त्वाचा आणि 'एव्हरग्रीन' कपडा आहे.
पांढरा शर्ट वापरून तुम्ही फॉर्मलपासून ते एकदम कॅज्युअल आणि कुल लूक मिळवू शकता.
पांढरा शर्ट निळ्या किंवा काळ्या रंगाच्या हाय-वेस्ट जीन्स किंवा रग्ड जीन्ससोबत पेअर करा. शर्ट पुढच्या बाजूने हलका 'फ्रेंच टक' करा
आतमध्ये एखादे काळ्या किंवा न्युड रंगाचे क्रॉप टॉप किंवा टँक टॉप घाला. त्यावर पांढऱ्या शर्टची बटणे उघडी ठेवून शर्ट जॅकेट किंवा श्रगसारखा वापरा.
शर्टची खालची दोन-तीन बटणे उघडी ठेवा आणि दोन्ही टोकं एकत्र करून कमरेवर एक सुंदर गाठ बांधा. हा शर्ट तुम्ही हाय-वेस्ट स्कर्ट, प्लाझो किंवा शॉर्ट्सवर घालू शकता.
पांढरा शर्ट एखाद्या फॉर्मल ट्राउझर किंवा पेन्सिल स्कर्टसोबत पूर्ण इन करून घाला. त्यावर एखादा छानसा ब्लेझर किंवा कोट लेअर करा.
पांढरा शर्ट एखाद्या जड बनारसी, सिल्क किंवा फ्लोरल लॉंग स्कर्टसोबत पेअर करा. शर्ट इन करून त्याच्या बाह्या कोपरापर्यंत वर फोल्ड करा.