Team Agrowon
बियाणे साठवणुकीपूर्वी ते चांगले कडक उन्हात वाळवावे.
बियाणे साठविण्यासाठी शक्यतो नवीन गोण्या /पोते वापरावे. गोण्या /पोते गरम पाण्यात ५० अंश सेल्सिअस तापमानापेक्षा अधिक १५ मिनिटे भिजवून नंतर सुकवून वापरावे.
धान्याची पोते लाकडी फळ्या किंवा बांबूच्या काठ्यावर भिंतीपासून ३ फूट लांब अंतरावर ठेवावेत. साठवणुकीच्या जागेतील परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा.
कडुनिंबाचा पाला, बियांची पावडर आणि तेलाचा उपयोग किडींना प्रतिबंधात्मक आणि खाण्यास विरोध करणारा आहे.
कडधान्यातील भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी निंबोळी पावडरीची (५ टक्के) बीज प्रक्रिया उपयुक्त आहे.
सोंडे या किडीसाठी हळदीची पावडर ३.२५ ग्रॅम किंवा वेखंड पावडर १० ग्रॅम प्रती किलो बियाणे प्रक्रिया फायदेशीर ठरते. (डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची शिफारस.)
बियाणे साठवणुकीस उत्तम पर्याय म्हणजे धातूच्या पत्र्याच्या कोठ्यांचा वापर करावा.
Compost Fertilizer : कंपोस्ट खत तयार करण्याची सोपी पद्धत