Radhika Mhetre
या रोगाचा प्रसार प्रामुख्याने हवेमधून, दूध, शेण, लघवी, वीर्य, पाणी पिण्याच्या जागा, गोठ्यात वापरत असलेली भांडी या मार्फत होतो.
बाधित जनावरांचा संपर्क येऊ शकणाऱ्या जागा म्हणजे जनावरांचे बाजार, यात्रा, पशू प्रदर्शने, साखर कारखान्याचे हंगाम त्याचबरोबर स्थलांतरित पक्षीदेखील या रोगाचा प्रसार करू शकतात.
सुरुवातीला जनावरांच्या तोंडातून लाळ गळते. तोंडामध्ये आणि पायांच्या खुरांमध्ये व्रण पडतात. तोंडामध्ये व्रण झाल्याने जनावरे काही खात नाहीत. जिभेला चट्टे पडतात.
या रोगाचा प्रसार थांबवायचा असेल तर आजारी जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवा.
जखमांवर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविक मलम लावावे. तोंडामधील व्रण पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने धुऊन स्वच्छ करावेत.
हा आजार होऊच नये म्हणून उपचारापेक्षा प्रतिबंध बरा म्हणून लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे आपल्या जनावराला लाळ्याखुरकूत रोगाची प्रतिबंधात्मक लस जरुर टोचून घ्या.
खुरांमध्ये झालेल्या जखमांवर माशा अंडी घालतात, त्यामुळे जखमा जास्त चिघळतात. जनावराला चालताना त्रास होतो. जनावर अचानक आजारी पडते. वजनात आणि दूध उत्पादनात घट होते.