Anuradha Vipat
मुलांना जंक फूडच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी घरातील जेवणाची पद्धत आणि पालकांच्या स्वतःच्या सवयी बदलणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे.
लहान वयात जंक फूडची लागलेली सवय पुढे जाऊन लठ्ठपणा, मधुमेह आणि सुस्ती यांसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देते.
घरात अशा अनहेल्दी गोष्टी आणणे आणि साठवणे पूर्णपणे बंद करा. डोळ्यांसमोर जंक फूड नसेल, तर मुलांची ते खाण्याची इच्छा आपोआप कमी होते .
मुलांना बाहेरच्या खाद्यपदार्थांचा रंग, आकार आणि चव आवडते, म्हणून घरातील जेवण आकर्षक बनवा. मुलांना बाहेरचे पदार्थ खाल्ल्याचा आनंदही मिळतो .
डायनिंग टेबलवर किंवा मुलांच्या नजरेस पडेल अशा ठिकाणी सफरचंद, केळी, द्राक्षे किंवा खजूर, बदाम, मखणा यांसारखे हेल्दी पदार्थ डब्यात भरून ठेवा.
संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून घरातील ताजे अन्न खाण्याची सवय लावावी. पालकांना हेल्दी अन्न खाताना पाहून मुलांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल होतो.
जंक फूड खाल्ल्याने पोट कसे दुखते, शरीरातील ताकद कशी कमी होते आणि खेळताना लवकर थकवा का येतो हे त्यांना गोष्टीच्या स्वरूपात किंवा कार्टून व्हिडिओ दाखवून समजावून सांगा.