Dengue Diet Plan : डेंग्यू ताप आला असल्यास काय खावे आणि काय टाळावे?

Anuradha Vipat

समस्या

डेंग्यू ताप आल्यावर शरीरातील प्लेटलेट्स वेगाने कमी होणे, तीव्र अशक्तपणा आणि डिहायड्रेशन या मुख्य समस्या जाणवतात.

Dengue Diet Plan | Agrowon

काय खावे?

डेंग्यूमध्ये शरीराला हायड्रेट ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी नारळ पाणी, ओआरएसचे पाणी, लिंबू पाणी आणि ताजी फळांची पातळ रसे भरपूर प्रमाणात प्या.

Dengue Diet Plan | agrowon

मुगाची मऊ खिचडी, ओट्स

तापामुळे पचनक्रिया मंदावते. त्यामुळे तांदळाची किंवा मुगाची मऊ खिचडी, ओट्स, रव्याचा उपमा आणि दलिया यांसारखे मऊ अन्न खावे.

Dengue Diet Plan | Agrowon

पपईच्या पानांचा रस

रोज १ ते २ चमचे पपईच्या पानांचा ताजा रस घेतल्यास प्लेटलेटची संख्या सुधारण्यास मदत होते.

Dengue Diet Plan | agrowon

हळदीचे दूध

रात्री झोपताना हळद घातलेले दूध प्यायल्याने संसर्गाशी लढण्याची ताकद वाढते.

Dengue Diet Plan | Agrowon

काय टाळावे?

जास्त तिखट, मसालेदार किंवा तळलेले पदार्थ भजी, समोसे, फास्ट फूड खाणे टाळा. यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि उलट्यांचा त्रास वाढू शकतो.

Dengue Diet Plan | agrowon

कॅफीनयुक्त पेये

कॉफी, चहा, एनर्जी ड्रिंक्स आणि थंड कोला पिणे टाळा. कॅफीनमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण आणखी कमी होते.

Dengue Diet Plan | Agrowon

Weight Gain Diet Plan : एका क्लिकवर जाणून घ्या अशक्तपणा दूर करून झटपट वजन वाढवण्यासाठी सर्वोत्तम डाएट

Weight Gain Diet Plan | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...