Anuradha Vipat
सकाळची सुरुवात करण्यासाठी काही सोप्या गोष्टी केल्याने तुमचा दिवस चांगला आणि उत्साही होऊ शकतो.
शक्य असल्यास दररोज एकाच वेळी उठण्याची सवय लावा. यामुळे तुमच्या शरीराची नैसर्गिक लय व्यवस्थित राहते
सकाळी थोडेसे चालणे, धावणे किंवा योगा केल्याने तुमचे शरीर आणि मन ताजीतवाने राहते.
उठल्याबरोबर एक ग्लासभर कोमट पाणी प्या. यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहते आणि पचनक्रिया सुधारते.
सकाळी उठल्यावर सकारात्मक गोष्टींचा विचार करा. तुम्ही काय साध्य करू शकता, याबद्दल विचार करा आणि तुमचा दिवस चांगला जाईल यावर विश्वास ठेवा.
सकाळी काही मिनिटे ध्यान केल्याने तुमचे मन शांत होते आणि एकाग्रता वाढते.
सकाळी चांगला आणि पौष्टिक नाश्ता करणे खूप महत्वाचे आहे. यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते.