Swarali Pawar
राज्यात रेशीम उद्योगासाठी पोकरा योजनेत एकरी ₹२.२९ लाख व मनरेगा योजनेत एकरी ₹३.५५ लाख अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते.
४ प्रमुख प्रकार तुती, इरी, टसर आणि मुगा रेशीम कीटक हे आहेत. यातील प्रत्येकाचे खाद्य, प्रदेश व रेशीमाची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत.
तुतीसाठी हलकी ते भारी जमीन, तिचा सामू ६.५ ते ७.२५ असावा. तुतीचे वाण V1, S-36, G-2, G-4, S-54 यापैकी निवडून बागायती पद्धतीने लागवड करावी.
तुतीच्या बागेला पहिल्या वर्षी शेणखत व कंपोस्ट, दुसऱ्या वर्षापासून रासायनिक खते ५ टप्प्यात द्यावे. तसेच ठिबक सिंचनाने पाण्याची बचत होत असल्याने ते वापरावे.
वर्षभरात १ हेक्टर तुती बागेतून ३०,००० कि.ग्रॅ. पाला मिळतो आणि ८००–१२०० कि.ग्रॅ. कोष उत्पादन होते. एकदा केलेली तुती लागवड १५ वर्षे पाला देते.
०.४ हेक्टर तुतीच्या लागवडीसाठी १३x७ मी. खोली आवश्यक असते. निर्जंतुकीकरणासाठी ब्लीचिंग पावडर व चुन्याचा वापर करावा.
अळीची वाढ २४ दिवसांत वाढ पूर्ण होते. माऊन्टेजमध्ये ठेवून कोष तयार होतात.
५–६ दिवसांनी कोष पूर्ण झाल्यावर कोष काढणी करावी.
राज्यात अमरावती, भंडारा, जालना, सोलापूर या ठिकाणी कोष खरेदी केंद्रे आहेत.
कर्नाटकमध्ये अधिक दर मिळाल्यास विक्री करणे शक्य आहे.