Swarali Pawar
काही फळे झाडावरच लहान व कडक होतात आणि पिकत नाहीत. सीताफळे दगडासारखी काळी आणि टणक बनतात त्यामुळे त्यांना ‘स्टोन फ्रूट’ म्हटले जाते.
फळ वाढीच्या काळात सतत बदलणारे वातावरण आणि फळांमध्ये अन्नद्रव्यांसाठीची स्पर्धा होते; यामुळे फळांमध्ये हा रोग जास्त दिसतो.
सीताफळे लहान, कडक, काळसर तपकिरी रंगाची होतात आणि फळांची वाढ थांबते.
सीताफळाच्या बागेत नियमितपणे मशागत करावी, बागेत मोकळेपणा व स्वच्छता ठेवावी.
मातीच्या गरजेनुसार सेंद्रिय व रासायनिक खते योग्य प्रमाणात आणि वेळेवर द्यावीत.
बहरधरण्याच्या काळात पाणी योग्य प्रमाणात व वेळेवर द्यावे आणि जमिनीतील ओलावा टिकवावा.
बागेमधील जमिनीत ओलावा राखण्यासाठी पेंढा किंवा गवताचे आच्छादन करावे किंवा बाजरीसारखी आंतरपिके घ्यावीत.
योग्य मशागत, खत व्यवस्थापन आणि पाण्याचा वेळेवर वापर केल्यास ‘स्टोन फ्रूट’ विकृतीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते.