Intercropping : अशी करा आंतरपिकाची निवड

Team Agrowon

कोरडवाहू जमिनीत आंतरपीक पद्धत नेहमीच फायद्याची दिसून आली आहे. सरासरीपेक्षा कमी किंवा जास्त पाऊस झाल्यास आंतरपीक पद्धतीमुळे हमखास उत्पादन मिळत.

Intercropping | Agrowon

कोरडवाहू जमिनीत म्हणजेच कमी पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश करावा. यामध्ये मूग, उडीद, चवळी, सोयाबीन यासारखी पिके घ्यावीत.

Intercropping | Agrowon

हलक्या आणि मध्यम जमिनीमध्ये मूग, उडीद, चवळी, सोयाबीन, भुईमूग यासारख्या नत्र स्थिरीकरण करणाऱ्या पिकांचा समावेश करावा.

Intercropping | Agrowon

मुख्य पीक आणि आंतरपीक एकमेकांशी जमीन, हवा, सूर्यप्रकाश पाणी आणि अन्नद्रव्य इत्यादीसाठी स्पर्धा करणार नसाव.

Intercropping | Agrowon

मुख्य पीक आणि आंतरपिकाची मुळे जमिनीच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये वाढणारी आणि जास्त पसरणारी असावीत. सूर्यफूल, मका यांसारखी खादाड पिके आंतरपीक म्हणून घेणं टाळावं.

Intercropping | Agrowon

सरासरी पाऊसमान आणि जमिनीचा प्रकार यावर आंतरपीक पद्धती फायद्याची ठरते. हलक्या जमिनीत बाजरी, कुळीथ, मटकी, हुलगा, तीळ, कारळा, एरंडी यांसारखी पिके घ्यावीत.

Intercropping | Agrowon

मध्यम जमिनीत तूर, बाजरी, सूर्यफूल, सोयाबीन आणि खरीप ज्वारी यांसारखी पिके घ्यावीत.

Intercropping | Agrowon

 मध्यम तसेच भारी जमिनीत कापूस, तूर, सोयाबीन आणि खरीप ज्वारी यांसारखी पिके घ्यावीत.

Intercropping | Agrowon
आणखी पाहा...