Anuradha Vipat
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नवीन कार किंवा बाईक खरेदी करणे हे प्रत्येक भारतीय कुटुंबाचे स्वप्न असते.
सणासुदीच्या काळात ऑटोमोबाईल कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या ऑफर्स, डिस्काउंट आणि आकर्षक व्याजदर जाहीर करतात.
घाईघाईत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, तुमची वाहनाची खरेदी फायदेशीर आणि सुरक्षित व्हावी यासाठी खालील टिप्स नक्की लक्षात ठेवा.
तुम्हाला वाहनाचा वापर नेमका कशासाठी करायचा आहे त्यानुसार हॅचबॅक, एसयूव्ही किंवा इलेक्ट्रिक वाहनचा पर्याय निवडा.
कंपन्या अनेकदा "₹१ लाखांपर्यंतचा फायदा" अशा जाहिराती करतात. यात अनेकदा जुन्या गाडीचा एक्सचेंज बोनस, लॉयल्टी बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट एकत्र जोडलेले असतात.
गाडी केवळ कागदावर किंवा व्हिडिओमध्ये पाहून आवडली म्हणून बुक करू नका. प्रत्यक्ष टेस्ट ड्राईव्ह घ्या. गाडीचे कम्फर्ट, हँडलिंग आणि केबिनमधील जागा तपासा.
एकाच शहरातील दोन किंवा तीन वेगवेगळ्या डीलर्सकडे जाऊन कोटेशन मागा.