Anuradha Vipat
दिवाळीला नातेवाईक आणि मित्रांना स्वतःच्या हाताने बनवलेले सुगंधी साबण गिफ्ट करणे ही एक अतिशय युनिक, सुबक आणि पर्यावरणपूरक आयडिया आहे.
हा केवळ एक सुखद अनुभव नाही, तर अभ्यंगस्नानाच्या परंपरेला आधुनिक आणि वैयक्तिक टच देण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
घरच्या घरी सुगंधी साबण कसे बनवायचे आणि त्याचे पॅकेजिंग कसे करावे, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
'ग्लिसरीन सोप बेस' किंवा 'गोट मिल्क सोप बेस' ,उटणे, चंदन, गुलाब, मोगरा, किंवा लॅव्हेंडर ऑइल, नैसर्गिक रंग, हळद, उटणे पावडर, केशर किंवा सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, सोप मोल्ड.
सोप बेसचे लहान लहान तुकडे करा. एका भांड्यात पाणी उकळायला ठेवून, त्यावर दुसऱ्या भांड्यात सोप बेस ठेवून तो 'डबल बॉइलर' पद्धतीने वितळवून घ्या.
बेस पूर्णपणे वितळल्यावर ५ ते १० थेंब तुमचे आवडते इसेन्शियल ऑइल घाला. त्यात १-२ चमचे उटणे पावडर किंवा थोडी हळद आणि केशर मिक्स करा. सिलिकॉन मोल्डच्या तळाशी सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या किंवा झेंडूच्या पाकळ्या पसरा. त्यावर हे वितळलेले मिश्रण हळूवारपणे ओता.
हे मोल्ड २ ते ३ तास रूम टेम्परेचरवर थंड होऊ द्या. साबण कडक झाल्यावर मोल्डमधून अलगद बाहेर काढा. तुमचा सुगंधी आणि घरगुती साबण तयार आहे!