Team Agrowon
पिकलेल्या फणसाचा पल्प करून तो पाण्यात उकळून त्याचे सेवन केल्याने ताजेतवाने वाटते.
फणसातील पोटॅशिअम रक्तदाब कमी करण्यास मदत करत असल्याने हृदयावरील अनेक समस्यांवर उपायकारक ठरते.
भरपूर प्रमाणात लोह असल्याने ॲनिमियासारख्या विकारांवर फणस खाणे फायद्याचे असते.
फणसाच्या मुळापासून बनवलेला काढा दम्यावर गुणकारी आहे.
फणसाच्या बिया त्वचा, डोळे आणि केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर मानले जाते.
थायरॉईडचा त्रास असणाऱ्या लोकांनी फणस खाणे फायद्याचे आहे. यातील खनिज आणि तांबे थायरॉईड नियंत्रित करण्यास मदत करतात.
हाडांसाठी फणस खाणे खूप लाभदायक असते. यात असलेले मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम हाडांसाठी गुणकारी असते.
Matki Health Benefits : मोड आलेली मटकी आहे सुपर फूड ; आहारातून जरुर घ्या