Anuradha Vipat
पोटात जंत होणे ही एक सामान्य समस्या आहे. दूषित पाणी, अस्वच्छ अन्न किंवा हातांच्या अस्वच्छतेमुळे होते.
पोटात जंत झाल्यास भूक न लागणे, पोटदुखी, वजन कमी होणे आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे दिसतात.
ओव्यामध्ये 'थायमॉल' नावाचे घटक असते, जे जंत नष्ट करते. ओवा पावडर कोमट पाण्यात मिसळून रोज सकाळी खावी.
कच्च्या पपईमध्ये 'पपेन' नावाचे एन्झाईम असते, जे जंतांचा नाश करते.
या बियांमध्ये 'क्युकरबिटासिन' हा घटक असतो, जो जंतांना अर्धांगवायू करतो, ज्यामुळे ते शरीराबाहेर पडतात.
रोज सकाळी रिकाम्या पोटी २ ते ३ कच्च्या लसणाच्या पाकळ्या चावून खाल्ल्याने पोट साफ होते.
कारल्याचा रस पोटातील जंत मारण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.