Anuradha Vipat
घरामध्ये कोंदटपणा किंवा इतर कारणांमुळे येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी नैसर्गिक घटक सर्वोत्तम पर्याय आहेत.
घरगुती रूम फ्रेशनर केमिकल युक्त स्प्रेपेक्षा सुरक्षित असून दुर्गंधी मुळापासून नष्ट करतात.
कचऱ्याचा डबा किंवा सिंकमधील दुर्गंधी घालवण्यासाठी तिथे थोडा बेकिंग सोडा पसरवून वरून लिंबाचा रस टाकावा.
घरात रोज संध्याकाळी कापूर आणि २-३ लवंग एकत्र जाळाव्यात. याच्या धुरामुळे घरातील हवेचे शुद्धीकरण होते.
स्प्रे बाटलीत समप्रमाणात पाणी आणि पांढरे व्हिनेगर मिक्स करून हवेत फवारावे.
स्वयंपाकघरात मसाल्यांचा किंवा ओलाव्याचा उग्र वास येत असल्यास एका लहान वाटीत कॉफी पावडर किंवा कॉफी बीन्स ठेवाव्यात.
एका पाण्याच्या स्प्रे बाटलीत थोडे लॅव्हेंडर किंवा लेमनग्रास इसेन्शियल ऑईल टाकून स्प्रे करावा.