Anuradha Vipat
वाढते कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी खालील बदल अत्यंत प्रभावी ठरतात.
आहारात ओट्स, कडधान्ये, फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन वाढवा.
जेवणात रिफाइंड तेलाऐवजी मोहरीचे तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा घाण्याचे तेल वापरा.
पॅकबंद फूड, बेकरी प्रॉडक्ट्स , समोसे आणि तळलेले पदार्थ खाणे बंद करा.
आठवड्यातून किमान १५० मिनिटे वेगाने चालणे , सायकलिंग, धावणे किंवा पोहणे यांसारखे कार्डिओ व्यायाम करा.
शरीराचे वजन वाढल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी बिघडते. त्यामुळे वजन आणि पोटावरील चरबी आटोक्यात ठेवा.
धुम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.