Anuradha Vipat
कूल आणि कम्फर्टेबल लुकसाठी 'मेसी बन' आणि 'पोनीटेल' हे दोन सर्वोत्तम हेअरस्टाईल ऑप्शन्स आहेत.
हे ऑप्शन्स तुम्हाला केवळ स्टाईलिश लुकच देत नाहीत, तर केसांना खराब होण्यापासून वाचवतात.
हा लुक कॅज्युअल वेअर, जीन्स-टीशर्ट किंवा ओव्हरसाईज्ड शर्ट्सवर अत्यंत हॉट आणि मॉडर्न दिसतो.
सर्व केस एकत्र करून डोक्याच्या वरच्या भागात किंवा मानेजवळ सैलसर पोनीटेलसारखे हातात पकडा. केसांना गोल फिरवून अंबाड्याचा आकार द्या .
लुक अधिक नॅचरल दिसण्यासाठी कपाळाच्या आणि कानाच्या बाजूने केसांच्या काही बटा हलक्याच बाहेर काढा.
ऑफिस, कॉलेज किंवा धावपळीच्या कामात कम्फर्टेबल राहण्यासाठी पोनीटेल हा कधीही फॅशनबाहेर न जाणारा पर्याय आहे.
सर्व केस डोक्याच्या वरच्या भागात घट्ट एकत्र करून ट्रेंडी स्क्रंचीजने बांधा. केसांना हलका मेसी लुक देऊन मानेजवळ सैलसर बांधा.