Cotton Gray Weevil : कपाशी पिकातील राखाडी भुंग्याची लक्षणे कशी ओळखाल?

Team Agrowon

कपाशी पिकामध्ये आढळणाऱ्या राखाडी भुंगा ही साधारण कमी नुकसानकारक कीड म्हणून ओळखली जायची. मात्र अलीकडच्या काळात ही कीड कपाशीतील मुख्य कीड होण्याच्या मार्गावर आहे.

Cotton Gray Weevil | Agrowon

बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये या किडीबाबत संभ्रमता आढळून येत आहे. बहुतांश शेतकरी या किडीला ‘मित्रकीटक’ समजत आहेत.

Cotton Gray Weevil | Agrowon

या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे पिकाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत, म्हणजेच रोप अवस्थेपासून पीक काढणीपर्यंत दिसून येतात.

Cotton Gray Weevil | Agrowon

अगदी सुरुवातीच्या २ पानांवर देखील लक्षणे दिसू लागतात. सुरुवातीला पाने कुरतडलेली किंवा पानांना छिद्रे पडलेली दिसतात. कुरतडलेली जागा इंग्लिश ‘U’ किंवा ‘V’ आकाराची दिसते.

Cotton Gray Weevil | Agrowon

अंड्यातून निघालेली अळी जमिनीमध्ये मुळांवर आपली उपजीविका करते. त्यामुळे झाडे कमकुवत होते. प्रादुर्भावग्रस्त झाडे सहज उपटून येतात.

Cotton Gray Weevil | Agrowon

मुळांना नुकसान केल्यामुळे जमिनीद्वारे होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव पिकामध्ये होण्याची शक्यता जास्त असते.

Cotton Gray Weevil | Agrowon

प्रौढ भुंगे पानाच्या कडा खातात. काही वेळा संपूर्ण पानाचे नुकसान करतात. त्यामुळे पानांची कार्यक्षमता कमी होते. काही भागांत झाडे जळल्यासारखी दिसतात.

Cotton Gray Weevil | Agrowon
आणखी पाहा...