Animal Care : जनावरांतील अस्थिभंगाची लक्षणे कशी ओळखायची?

Team Agrowon

वय, आजार आणि पोषणातील चुन्याच्या अभावामुळे हाड नाजूक आणि ठिसूळ होऊन मोडते. अपघातामध्ये हाडे मोडण्याचा संभव असतो. जनावरांमध्ये पायाचा अस्थिभंग जास्त प्रमाणात दिसतो.

Animal Care | Agrowon

जनावरांच्या अस्थिभंगाची सर्वसाधारण लक्षणे माणसाप्रमाणेच असतात. श्रोणीफलकाचा अस्थिभंग झाल्यास मोडलेल्या हाडावर भार देऊन जनावर उभे राहू शकत नाही.

Animal Care | Agrowon

चेहऱ्याच्या हाडांपैकी कोणत्याही हाडाचा भंग झाला तर अन्न चावणे किंवा रवंथ करणे शक्य होत नाही. लाळ सारखी गळत राहते. दात तुटतात.

Animal Care | Agrowon

मणक्याचा अस्थिभंग घोडा आणि श्‍वानामध्ये अधिक प्रमाणात दिसतो. फऱ्याच्या हाडाजवळ जाड स्नायूंमुळे मोडलेल्या हाडाचे तुकडे एकमेकांपासून फार दूर जात नाहीत, त्यामुळे अस्थिभंग लवकर बरा होतो.

Animal Care | Agrowon

मोडलेले हाड जुळून येणे हे जनावरांमध्ये सोपे नसते. अस्थिभंगाबरोबरच जखम झाली असेल, तर त्या जखमेत जंतुसंसर्ग होऊन पू होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते.

Animal Care | Agrowon

अस्थिभंगाच्या जागी असह्य वेदना होते. वेदनेच्या जागेवरून अस्थिभंग कोठे आहे हे शोधता येते.

Animal Care | Agrowon

अस्थिभंगामुळे त्या भागाची हालचाल कमी होते किंवा बंद पडते. हाड तुटल्यामुळे पुढची हालचाल होत नाही. हालचालीमुळे वेदना होत असल्याने पशू तो भाग हलवत नाही.

Animal Care | Agrowon
आणखी पाहा...