Bird Flue : कोंबड्यांतील बर्ड फ्लू ची लक्षणे कशी ओळखायची?

Team Agrowon

एव्हीयन इन्फ्लूएन्झा किंवा “बर्ड फ्लू” हा एक संसर्गजन्य रोग असून, सर्व प्रकारच्या पक्ष्यांमध्ये संक्रमित होतो. हा रोग ‘एच ५ एन १’ या विषाणूमुळे होतो. यात पक्ष्यांची मरतूक ८० ते १०० टक्क्यांपर्यंत होते.

Bird Flue | Agrowon

प्रथमत: कोंबड्यांचे खाणे पिणे बंद होऊन ते सुस्तावतात. 

Bird Flue | Agrowon

नाका तोंडातून रक्तमिश्रित स्राव बाहेर येतो. 

Bird Flue | Agrowon

तोंडाचा व डोक्याचा भाग सुजलेला दिसतो. 

Bird Flue | Agrowon

डोळ्यांच्या पापण्याच्या आतील भाग लाल होतो व सुजलेला दिसतो.

Bird Flue | Agrowon

विष्ठा हिरव्या रंगाची होते व पायांना सूज येते. श्‍वसनाचा त्रास होतो, शिंका येतात व श्‍वास घेताना घरघर आवाज येतो. श्‍वासोच्छ्‌वासात अडथळे येऊन पक्षी दगावतात.

Bird Flue | Agrowon

पक्षी चालताना अडखळतात. पंख विखुरतात व गळतात, पक्षी निस्तेज दिसतात. अंडी उत्पन्न कमी होते.

Bird Flue | Agrowon
आणखी पाहा...