Anuradha Vipat
लिव्हर खराब झाले आहे हे ओळखण्यासाठी काही लक्षणे दिसू शकतात. लिव्हर हा मानवी शरीराचा महत्वाचा अवयव आहे
यकृताच्या समस्येमुळे ओटीपोटात दुखू शकते. विशेषत: उजव्या बाजूला.
यकृताच्या समस्येमुळे शरीरात द्रव जमा होऊ शकतो ज्यामुळे पाय आणि टाचांवर सूज येऊ शकते.
यकृत योग्यरित्या काम करत नसल्यास, भूक कमी होऊ शकते.
यकृत योग्यरित्या काम करत नसल्यास, शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ शकतात, ज्यामुळे थकवा जाणवतो.
त्वचेचा आणि डोळ्यांचा रंग पिवळा होणे हे यकृतातील बिलीरुबिनच्या वाढलेल्या पातळीमुळे होते.
यकृत खराब झाल्यास मळमळ आणि उलट्या होऊ शकतात.