Goat Farming: दुष्काळात शेळीपालनातून मिळवा जोडधंद्याचा आधार; करडांच्या संगोपनासाठी ८ टिप्स

Swarali Pawar

उत्पन्नाचा आधार

दुष्काळात शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन फायदेशीर ठरू शकते. करडांची योग्य निवड करून त्यांचा आहार, निवारा आणि आरोग्य सांभाळल्यास चांगली वाढ मिळवता येते.

Goat Kid Care During Winter | Agrowon

करडांची खरेदी

एकाच वयाची, चांगली वाढ झालेली आणि नुकतीच दूध सोडलेली करडे निवडा. करडे चपळ व निरोगी असावीत. खरेदीवेळी वय, वजन आणि लसीकरणाची माहिती घ्या.

Goat Kid Care During Winter | Agrowon

करडांना वेगळे ठेवा

नवीन खरेदी केलेली करडे लगेच कळपात मिसळू नका. काही दिवस स्वतंत्र ठेऊन त्यांच्या आरोग्याचे निरीक्षण करा. आजारी करडांना इतरांपासून वेगळे ठेवा.

Goat Kid Care During Winter | Agrowon

जन्मानंतर चीक पाजणे

करडांच्या जन्मानंतर पहिल्या अर्ध्या तासात आईचा चीक पाजावा. आईचे दूध उपलब्ध नसेल तर दुसऱ्या शेळीचा चीक द्यावा. दूध अचानक बंद करू नका. १० ते १५ दिवसांनी हळूहळू लुसलुशीत चारा द्यायला सुरुवात करा.

Goat Kid Care During Winter | Agrowon

आहार आणि पाणी

हिरवा, वाळलेला चारा तसेच सुबाभूळ, शेवरी, बाभूळ आणि शेवग्याचा पाला द्या. चारा थोडा वाळवून द्यावा. तीन ते बारा महिन्यांच्या करडांना साधारण १०० ते २०० ग्रॅम पूरक खाद्य देता येते. आहाराचे प्रमाण वय आणि वजनानुसार ठरवा.

Goat Kid Care During Winter | Agrowon

स्वच्छ आणि उबदार गोठा

गोठा कोरडा, स्वच्छ आणि हवेशीर असावा. लहान आणि मोठी करडे वेगळी ठेवा. हिवाळ्यात जमिनीवर गोणपाट किंवा गवत अंथरा. थंडीपासून बचावासाठी शेडनेटचा वापर करा.

Goat Kid Care During Winter | Agrowon

आजारांची लक्षणे

जुलाब, खोकला, अशक्तपणा, फुफ्फुसदाह आणि संसर्गजन्य आजारांकडे दुर्लक्ष करू नका. अस्वच्छता, गर्दी आणि ओलसर वातावरणामुळे आजारांचा धोका वाढतो. लक्षणे दिसताच पशुवैद्यकांचा सल्ला घ्या.

Goat Kid Care During Winter | Agrowon

लसीकरण आणि जंतनाशकाचे नियोजन

फुफ्फुसदाह, घटसर्प, बुळकांडी, आंत्रविषार आणि पीपीआर यांसारख्या रोगांसाठी लसीकरणाचे नियोजन करा. ऋतुमानानुसार जंतनाशक द्या. गोचीड व पिसव्यांच्या नियंत्रणासाठी पशुवैद्यकांचा सल्ला घ्या.

Goat Kid Care During Winter | Agrowon

Dushkal Keli Lagwad: दुष्काळात कांदेबाग केळीची लागवड करताना या ७ गोष्टी तपासा, मिळेल शाश्वत उत्पादन

अधिक माहितीसाठी..