Swarali Pawar
गोठ्यात पाणी साचू नये याची खबरदारी घ्या. वातावरण हवेशीर व कोरडे ठेवणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात रात्री थंडी वाढते. गोठा ताडपत्रीने झाका किंवा खिडक्या बंद करा, पण हवा खेळती ठेवा.
करड्यांना उबदार वातावरण द्या. १०० किंवा २०० वॅटचा बल्ब लावून उष्णता पुरवा.
शेळ्यांना सुका व स्वच्छ चारा द्या. ओला व बुरशी लागलेला चारा टाळा.
हिरवा चारा वाळवून द्या. यामुळे अपचन व हगवणसारखे रोग टळतात.
अतिवृष्टीत रोगाचा धोका जास्त असतो. घटसर्प, ईटीव्ही व सर्दी-निमोनिया यावर लस द्यावी.
चिखलात उभे राहिल्याने Foot rot होतो. बुरशी लागलेल्या चाऱ्यामुळे अपचन व हगवण वाढते.
मृत जनावरांचा योग्य निपटारा करा. ते जाळा किंवा पुरा, जेणेकरून रोगराई पसरणार नाही.