Swarali Pawar
थंडीमध्ये जनावरांची ऊर्जा गरज १०–१५% वाढते. त्यासाठी मक्याचा कोंडा, गहू, ज्वारी पीठ आणि तेलबिया खळ वाढवून द्यावे.
प्रत्येक १ लिटर दुधासाठी ४००–४५० ग्रॅम सरेडी किंवा कन्सन्ट्रेट आहार देणे फायदेशीर.
यामुळे उत्पादन स्थिर राहते आणि जनावरांची ताकद टिकते.
दररोज ५०–६० ग्रॅम खनिज मिश्रण द्यावे. हिवाळ्यात व्हिटॅमिन A, D आणि E देणे अत्यंत आवश्यक आहे.
आहारात ६०% हिरवा चारा आणि ४०% कोरडा चारा ठेवावा. दुधाळ जनावरांना २०–२५ किलो हिरवा व ६–८ किलो कोरडा चारा द्यावा.
थोड्या प्रमाणात गूळ (२००–३०० ग्रॅम) आणि शेंगदाणा/तिळतेल (५०–१०० मिली) मिसळून द्या.
यामुळे उष्णता वाढते आणि आहाराची चव सुधारते.
प्रॉबायोटिक्स, यीस्ट आणि बायपास फॅट दिल्यास पचन सुधारते. हे पदार्थ दूध उत्पादन टिकवण्यासाठी मदत करतात.
थंड पाणी पिल्याने भूक कमी होते आणि दूध कमी येते. दिवसात किमान ३ वेळा २५–३०°C तापमानाचे पाणी द्यावे.
आहारात रोज ३०–४० ग्रॅम मीठ मिसळण्याची शिफारस आहे. नव्याने प्रसूत गाईंना अतिरिक्त ऊर्जा आहार द्यावा, असे तज्ज्ञ सांगतात.