Anuradha Vipat
आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि कॉम्प्युटर आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत.
तासनतास मोबाईल स्क्रीनकडे सतत पाहिल्यामुळे डोळे कोरडे पडणे, डोळ्यांची जळजळ होणे, पाणी येणे, अंधुक दिसणे आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात.
दर २० मिनिटांनी, २० सेकंदांसाठी, किमान २० फूट अंतरावर असलेल्या कोणत्याही वस्तूवर किंवा झाडावर लक्ष केंद्रित करा.
मोबाईल वापरताना जाणीवपूर्वक डोळ्यांची सतत उघडझाप करत राहा.डोळ्यांची उघडझाप केल्यामुळे डोळ्यांमध्ये नैसर्गिक ओलावा तयार होतो.
खोलीत जेवढा प्रकाश आहे, त्यानुसारच स्क्रीनचा ब्राइटनेस असावा. खूप जास्त किंवा अगदी कमी ब्राइटनेस ठेवल्यास डोळ्यांवर ताण पडतो.
मोबाईल नेहमी डोळ्यांपासून किमान १६ ते १८ इंच अंतरावर आणि डोळ्यांच्या पातळीपेक्षा थोडा खाली धरावा.
रात्रीच्या वेळी मोबाईलमधील 'आय कम्फर्ट शील्ड' किंवा 'ब्लू लाईट फिल्टर' मोड नेहमी ऑन ठेवा.