Swarali Pawar
पावसामुळे शेतात पाणी साचल्याने मुळांना पोषण मिळत नाही आणि पिकांवर रोगांचा धोका वाढतो. ढगाळ वातावरण, कमी सूर्यप्रकाश आणि अचानक ऊन यामुळे बुरशीजन्य संसर्ग वेगाने पसरतो.
जास्त पाऊस, पाणी साचणे आणि अचानक ऊन यामुळे पॅराविल्ट रोगाचा प्रादुर्भाव होतो.
मुळे काळसर होतात, पाने पिवळसर पडतात आणि फुलोऱ्याच्या काळात झाडे कोमेजतात.
कॉपर ऑक्सीक्लोराईट २५० ग्रॅम + युरिया २ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. कार्बेन्डाझिम १० ग्रॅम + मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कपाशीच्या पानांवर व बोंडांवर गोलाकार, काळसर ठिपके दिसल्यास करपा रोग ओळखावा.
हा रोग वेळीच नियंत्रित न केल्यास पिकाचे मोठे नुकसान होते.
पायरोक्लोस्ट्रोबिन १० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मेटिराम ५५% + पायरोक्लोस्ट्रोबिन ५% मिश्रण २० ग्रॅम वापरून १०-१५ दिवसांच्या अंतराने फवारणी करा.
पांढरी माशीमुळे कपाशीवरील पाने चिकट होतात व झाडे खुंटतात. कळ्या व फुले गळतात, ज्यामुळे उत्पादनात मोठी घट होते.
पिवळे चिकट सापळे लावावेत आणि ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी. व्हर्टिसिलियम लेकॅनी बुरशीजन्य कीडनाशक किंवा बुप्रोफेझीन २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.
तण नियंत्रण, आंतरमशागती, मित्रकिड संवर्धन आणि निंबोळी अर्काचा वापर करा.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने रासायनिक + जैविक उपाय एकत्र वापरून कपाशीचे उत्पादन सुरक्षित ठेवा.