Crop Protection: सततच्या पावसात पिकांचे रक्षण कसे कराल?

Swarali Pawar

पूरपरिस्थिती

राज्यात सतत पाऊस व पूरस्थितीमुळे पिकहानी वाढली आहे. तरी तग धरलेली पिके योग्य व्यवस्थापन केल्यास शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतात.

Heavy Rainfall in Maharashtra | Agrowon

प्रथम निचरा

शेतात साचलेले पाणी ताबडतोब बाहेर काढावे. सऱ्या खोदून पाणी जिरण्याची सोय करावी. शेतातील साचलेले पाणी काढण्यासाठी कोरुगेटेड पाईप, पीव्हीसी पाईपचा वापर करावा.

Water Drainage | Agrowon

आंतरमशागतीवर भर

पाऊस थांबून वाफसा आला की लगेच आंतरमशागत व कोळपणी करावी. माती मोकळी झाली की मुळांना हवा मिळते आणि पिकाची वाढ होण्यास सुरुवात होते.

Intercultural Operations | Agrowon

पूर्वतयारी

पूर येणाऱ्या ठिकाणी आधीच निचऱ्याच्या सऱ्या खोदून ठेवाव्यात. शक्यतो त्या ठिकाणी सऱ्यांचे जाळे तयार करा जेणेकरून पाणी साचणार नाही.

Making Furrows | Agrowon

पिकाचे पोषण

पाण्याचा निचरा झाल्यावर नत्र-स्फुरद-पालाश १९:१९:१९ ची फवारणी करा. पिकाच्या वयानुसार ५०ग्रॅम (३०+ दिवस), १०० ग्रॅम (~२० दिवस), किंवा २०० ग्रॅम (६०+ दिवस) १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

Fertilizer Application | Agrowon

इतर पर्याय

साचलेल्या पाण्यात पिकाची वाढ खुंटते त्यामुळे नत्र-स्फुरद-पालाश १३:००:४५ चे २०० ग्रॅम किंवा १९:१९:१९ चे १०० ग्रॅम एकत्र १० लिटर पाण्यात फवारल्यास पिकाची वाढ होण्यास मदत होते.

Effective Fertilizers | Agrowon

कीड-रोगांवर कारवाई

प्रारंभिक डाग/कुज दिसताच मॅन्कोझेब किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. हवामान ओलसर असेपर्यंत रोगनियंत्रणात खंड पडू देऊ नये.

Insecticide Fungicide Application | Agrowon

जैविक उपाय

कापूस/हळद यांसारख्या पिकांवर ट्रायकोडर्मा, बायोमिक्स शिफारशीनुसार आवळणी करावी. पाण्याचा निचरा, पिकाचे पोषण, रोगनियंत्रण यांची वेळेवर अंमलबजावणीच उरलेल्या पिकांचे उत्पादन सुरक्षित ठेवते असा सल्ला शास्त्रज्ञ देतात.

Organic Application | Agrowon

Leaf Crinckle in Mung: मुगावरील लिफ क्रिंकलचे असे करा व्यवस्थापन

Leaf Crinckle in mung crop | Agrowon
अधिक माहितीसाठी...