Summer Irrgation Care: हंगाम संपल्यावर सिंचन संच बंद करण्याआधी महत्त्वाच्या ३ स्टेप्स!

Swarali Pawar

सिंचन संच थेट बंद करू नका!

उन्हाळा संपत आला की अनेक शेतकरी ठिबक संच काढून ठेवतात. पण योग्य प्रक्रिया न केल्यास संच खराब होऊ शकतो.

Irrigation system cleaning | Agrowon

फ्लशिंग का महत्त्वाचं?

नळ्यांमध्ये माती, वाळू आणि कचरा साचतो. स्वच्छ पाण्याने फ्लशिंग केल्याने हे सर्व बाहेर पडते.

Irrigation system cleaning | Agrowon

फ्लशिंग कसं कराल?

सुरुवातीला मुख्य लाईन, मग उपलाईन आणि शेवटी लॅटरल फ्लश करा. एंड कॅप उघडून पाणी सोडा, स्वच्छ पाणी येईपर्यंत प्रक्रिया करा.

Irrigation system cleaning | Agrowon

अॅसिड ट्रीटमेंट का गरजेची?

नळ्यांमध्ये क्षार साचल्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी होतो. अॅसिड ट्रीटमेंटमुळे हे क्षार विरघळून साफ होतात.

Irrigation system cleaning | Agrowon

अॅसिड ट्रीटमेंट कशी कराल?

१०० लिटर पाण्यात ०.५ ते १ लिटर अॅसिड मिसळा. हे मिश्रण संचात सोडून २४ तास ठेवा, नंतर फ्लश करा.

Irrigation system cleaning | Agrowon

सुरक्षितता महत्त्वाची!

अॅसिड नेहमी पाण्यात मिसळा, उलट करू नका. हातमोजे, मास्क आणि गॉगल वापरणं आवश्यक आहे.

Irrigation system cleaning | Agrowon

क्लोरीन ट्रीटमेंट विसरू नका

शेवाळ आणि जिवाणू वाढू नयेत म्हणून क्लोरीन वापरा. २०-३० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने पुन्हा फ्लश करा.

Irrigation system cleaning | Agrowon

संच जपून ठेवा

पाईप्स उन्हात पडू देऊ नका, त्यावर आच्छादन ठेवा. उंदीर व गंजापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी संच ठेवा.

Irrigation system cleaning | Agrowon

Tomato Crop Management: उन्हाळ्यात टोमॅटो पीक वाचवा! तज्ज्ञांचे सोपे उपाय

अधिक माहितीसाठी...