Swarali Pawar
गोठा आणि दूध काढण्याची जागा वेगळी व स्वच्छ ठेवावी. आसपास घाण किंवा धूळ नसावी.
दुभत्या जनावराच्या कमरेचा भाग, मागील मांड्या, शेपटी आणि कास स्वच्छ कापडाने पुसावी. यामुळे जनावर निरोगी राहते.
कोमट पाण्यात थोडे पोटॅशियम परमँगनेट टाकून त्या पाण्याने कास धुवावी व लगेच कोरड्या फडक्याने पुसावी.
दूध काढण्यासाठी स्वच्छ भांडी, कप व गाळण्यासाठी सुती कपडा तयार ठेवावा. हात धुऊन मगच दूध काढावे.
सुरुवातीच्या काही धार वेगळ्या कपात काढाव्यात. दूध संपूर्ण मुठ वापरून ७-८ मिनिटांत काढावे.
डोम आकाराची भांडी वापरावीत. दूध काढताना जनावराला कांदा, लसूण, मूरघास यासारखे खाद्य देऊ नये.
दूध गाळून स्वच्छ स्टीलच्या भांड्यात ठेवावे. शक्य असल्यास ते बर्फाच्या पाण्यात किंवा माठातील गार पाण्यात ठेवावे.
थंड पाण्यात साठवलेले दूध जास्त काळ टिकते. ते शक्य तितक्या लवकर वापरावे किंवा विक्री करावी.