Team Agrowon
गेल्या काही वर्षांपासून खरिपातील भात, ऊस, ज्वारी आणि सोयाबीनवरही हुमणीचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. हुमणी किडीची अळी पिकाची मुळे करतडून नुकसान करते.
पहिला पाऊस झाल्यावर हुमणीचे भुंगेरे सुर्यास्तानंतर बाभूळ, बोर, लिंब या झाडांवर पाने खाण्यासाठी गोळा होतात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करुन रॉकेल मिसळलेल्या पाण्यात टाकून मारावेत.
जमिनीची १५ ते २० सेंमी खोल नांगरट करावी. नांगरणीवेळी उघड्या पडणाऱ्या अळ्या गोळा करुन रॉकेल मिसळलेल्या पाण्यात टाकून माराव्यात. दोन नांगरटी केल्यास ७० टक्के हुमणीच नियंत्रण होत.
किटकनाशकाची फवारणी करुन बाभूळ, कडूनिंब यांच्या फांद्या शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवाव्यात. रात्रीच्या वेळी अशा फांद्यावरील पाने खाल्ल्यामुळे हुमणीचे भुंगेरे मरुन जातील.
शेतात ठिकठिकाणी प्रकाश सापळे लावल्यासही प्रौढ भुंगेऱ्याचं खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण होत.
हुमणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिचे नैसर्गिक शत्रू महत्वाचे आहेत. यामध्ये बगळा, चिमणी, मैना, कावळा, घार इ. पक्षी हुमणीचा फडशा पाडतात.
हुमणीचा प्रादुर्भाव जर जास्त असेल तर मेटारायझियम अॅनिसोप्ली हे बुरशीजन्य कीटकनाशक एकरी ८ ते १० किलो या प्रमाणात कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे.