Anuradha Vipat
केसांचे टोक दुभंगणे म्हणजेच स्प्लिट एंड्स झाल्यामुळे केसांची वाढ खुंटते आणि केस कोरडे, झाडू सारखे निर्जीव दिसू लागतात.
हेअर स्ट्रेटनिंग, उष्णता देणारी साधने आणि चुकीच्या पद्धतीमुळे केसांचे क्युटिकल्स खराब होऊन ही समस्या निर्माण होते.
स्प्लिट एंड्स पूर्णपणे बरे करण्याचा एकमेव खात्रीशीर मार्ग म्हणजे ते कापून टाकणे. दर ६ ते ८ आठवड्यांनी केसांची खालची टोकं किंचित ट्रिम करा.
हेअर ड्रायर, स्ट्रेटनर किंवा कर्लिंग आयर्नचा अतिवापर केसांमधील नैसर्गिक ओलावा शोषून घेतो, ज्यामुळे केस टोकापाशी दुभंगतात.
केस ओले असताना ते सर्वात जास्त नाजूक आणि लवचिक असतात. अशा वेळी बारीक दातांच्या कंगव्याने किंवा ब्रशने केस विंचरल्यास ते टोकापासून तुटतात आणि स्प्लिट एंड्स वाढतात.
ठवड्यातून दोनदा कोमट नारळाचे तेल, बदाम तेल किंवा एरंडेल तेल केसांच्या टोकांना आवर्जून लावा. हे तेल नैसर्गिक सीलंटसारखे काम करते.
झोपताना सॅटिन किंवा सिल्कच्या कापडाचे उशीचे कव्हर वापरा.