Perani Yantra: अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 2 फायदेशीर पेरणी यंत्रे!

Swarali Pawar

पेरणीत अचूकता का महत्त्वाची?

योग्य अंतर आणि योग्य खोलीवर पेरणी झाल्यास उगवण चांगली होते. त्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते.

Manual Seed Drill | Agrowon

मनुष्यचलित टोकण यंत्र म्हणजे काय?

हे यंत्र लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी किफायतशीर पर्याय आहे. यामुळे अचूक अंतरावर बियाणे पेरता येते.

Manual Seed Drill | Agrowon

कोणत्या पिकांसाठी उपयुक्त?

मका, सोयाबीन, तूर, हरभरा, तीळ, गहू आणि जवस यांसारख्या अनेक पिकांची पेरणी या यंत्राने करता येते.

Manual Seed Drill | Agrowon

बी आणि खत एकाच वेळी

या यंत्रात बियाणे आणि खतासाठी स्वतंत्र डबे असतात. त्यामुळे एकाच वेळी पेरणी आणि खत देणे शक्य होते.

Manual Seed Drill | Agrowon

यंत्र वापरताना काय लक्षात ठेवाल?

जमीन भुसभुशीत आणि ढेकळविरहित असावी. तसेच पिकानुसार योग्य प्लेट बसवून मध्यम वेगाने यंत्र चालवावे.

Manual Seed Drill | Agrowon

बैलचलित पेरणी यंत्राचे फायदे

बैलजोडी असलेल्या शेतकऱ्यांसाठी हे यंत्र उपयुक्त ठरते. यामुळे मजुरी खर्च कमी होतो आणि पेरणी जलद होते.

Manual Seed Drill | Agrowon

अनेक पिकांसाठी एकच यंत्र

ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, हरभरा आणि सोयाबीनची पेरणी या यंत्राद्वारे सहज करता येते.

Manual Seed Drill | Agrowon

बियाण्यांची बचत, उत्पादनात वाढ

या यंत्रांमुळे बियाणे योग्य अंतरावर आणि योग्य खोलीवर पडते. त्यामुळे बियाण्यांची बचत होऊन पिकांची उगवण अधिक चांगली होते.

Manual Seed Drill | Agrowon

Cotton Variety Selection: कापसाचा वाण निवडताना या ८ गोष्टी लक्षात ठेवा!

Agrowon
अधिक माहितीसाठी..