Animal Heat Stress : जनावरांतील उष्माघात कसा टाळायचा ?

Team Agrowon

गोठ्यात स्वच्छ आणि ताजी खेळती हवा येईल यासाठी पुरेशी वायुविजन व्यवस्था असावी.

Animal Heat Stress | Agrowon

जनावरांना प्रति तास तीन ते पाच लिटर पाण्याची गरज असते. त्यामुळे पुरेसे थंड आणि स्वच्छ पाणी उपलब्ध असावे.

Animal Heat Stress | Agrowon

जनावरांना उघड्यावर, उन्हात किंवा उन्हाच्या झळा बसतील अशा ठिकाणी बांधू नये.

Animal Heat Stress | Agrowon

जनावरांना दिवसातून चार वेळा वैरण द्यावी. हिरव्या वैरणीचे प्रमाण वाढवावे. जनावरे हिरवी वैरण आवडीने खातात. त्यामुळे त्याच्या शरीरास आवश्यक पोषण मुल्यांची पूर्तता होते.

Animal Heat Stress | Agrowon

छताची उंची कमीत कमी दहा फूट असावी. त्यामुळे गोठ्यात हवा खेळती राहते.

Animal Heat Stress | Agrowon

गोठ्याचा तळ सिमेंट काँक्रीटचा असावा. मात्र निसरडा नसावा. त्यास पाणी आणि मूत्राचा निचरा होण्यासाठी प्रमाणशीर उतार असावा.

Animal Heat Stress | Agrowon

गोठ्याचे छत उष्णतारोधी असावे. छतावर उष्णतारोधी पांढरा रंग लावावा. छतावर वाळलेल्या गवताचा किमान सहा इंचाचा थर द्यावा.

Animal Heat Stress | Agrowon
आणखी पाहा...