Anuradha Vipat
फळे कापल्यानंतर हवेच्या संपर्कात आल्यामुळे काही वेळातच काळी किंवा तपकिरी पडू लागतात. या प्रक्रियेला 'ऑक्सिडेशन' म्हणतात.
फळे कापल्यानंतर ती दीर्घकाळ ताजी आणि फ्रेश राहावीत यासाठी काही अत्यंत सोपे आणि घरगुती उपाय खालीलप्रमाणे आहेत.
कापलेल्या फळांच्या तुकड्यांवर लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका किंवा फळे लिंबाच्या पाण्यात बुडवून ठेवा.
फळे कापल्याबरोबर ताबडतोब थंड पाण्यात किंवा बर्फाच्या पाण्यात टाकून ठेवा.
एका भांड्यात पाणी घेऊन त्यात अगदी चिमूटभर मीठ टाका आणि त्यात कापलेली फळे २ ते ३ मिनिटे बुडवून ठेवा.
दोन कप पाण्यात दोन चमचे मध चांगला मिक्स करा. या मध-पाण्याच्या मिश्रणात कापलेली फळे काही मिनिटे भिजवून ठेवल्यास ती ८ ते १० तास अगदी फ्रेश राहतात.
फळे कापल्यानंतर ती उघडी न ठेवता ताबडतोब 'एअर टाईट' कंटेनरमध्ये बंद करून फ्रिजमध्ये ठेवा .