Team Agrowon
दुधाचे दर हे फॅटवर ठरवले जातात. याशिवाय दुधाची चव, स्वाद बऱ्याच प्रमाणात दुधातील फॅटवर अवलंबून असते. पण वाढत्या उष्णतेमुळे गायी, म्हशींच दूधही कमी होतं. याशिवाय दुधातील फॅट कमी लागण्याची शक्यता असते.
गाय किंवा म्हैस विल्यानंतर पहिले दहा दिवस दुधातील फॅट चांगले असते. जसजसं दूध वाढत जातं तसं दुधातील फॅटचं प्रमाण कमी होत जातं.
गाय, म्हैस विल्यानंतर दोन ते चार महिन्यांपर्यंत दुधाचं उत्पादन थोडं थोडं वाढू लागतं. त्यानंतर वाढून स्थिर राहतं. ज्या वेळी जनावर आटण्यास येतं त्याच्या अगोदर काही आठवडे दूध उत्पादन कमी झालेलं असतं आणि दुधातील फॅटचं प्रमाण वाढलेलं असतं.
जनावरांच्या आहारात एकूण तंतुमय घटकांचे प्रमाण म्हणजेच कडबा किंवा वैरणीचे प्रमाण २८ ते ३१ टक्के असणे आवश्यक आहे. दुधाळ जनावरांना आहारातून एकूण ६५ ते ७५ टक्के कडब्याचे प्रमाण मिळाले पाहिजे.
दूध उत्पादन क्षमता आणि स्निग्धांशाचे प्रमाण हे गुणधर्म गुणसूत्राद्वारे नियंत्रित केले जातात. त्यामुळे आनुवंशिकता किंवा जनावराची जात कोणती आहे यावरही दुधातील फॅटचे प्रमाण ठरते.
वर्षभर जो चारा उपलब्ध असेल तो जनावरांना खाऊ न घालता, चाऱ्याचे नियोजन करून जनावरांना योग्य प्रमाणात हिरवा आणि सुका चारा खाऊ घालावा.
दूध काढण्याच्या दोन वेळांमध्ये जास्तीत जास्त १२ तासांचं अंतर असावं. हे अंतर वाढल्यास दुधाचे प्रमाण वाढू शकेल; पण दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते.
दूध काढताना सुरुवातीच्या धारांमध्ये स्निग्धांशाचे प्रमाण साधारणपणे एक टक्का, तर शेवटच्या धारांमध्ये हे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत असते. त्यामुळे कासेतील पूर्ण दूध काढून घेण गरजेचं आहे.
Tomato Varieties : भरघोस उत्पादनासाठी टोमॅटोचे संकरित, सुधारित वाण