Swarali Pawar
हिरवा चारा सुरक्षित ठेवण्याची व साठवण्याची पद्धत म्हणजे मुरघास असतो. तो आंबट-गोड लागतो आणि जनावरेही तो आवडीने खातात.
मक्याचे पीक दाणे दुधाळ असताना कापावे. तर ज्वारी व बाजरी फुलोऱ्यावर असताना कापावा.
कापलेले पीक कुट्टी यंत्राने बारीक कुटून घ्यावे आणि नंतर ही कुट्टी थेट खड्ड्यात भरावी.
खड्डा भरताना सतत दाब देणे गरजेचे आहे. हवा राहिल्यास चारा कुजण्याची शक्यता असते.
साठवलेल्या चाऱ्यावर १ ते १.५% गुळाचे पाणी फवारावे. सोबतच १% युरियाचे पाणी मिसळल्यास मुरघासाचा दर्जा सुधारतो.
खड्डा पूर्ण भरल्यानंतर त्यावर वैरणीचा ढीग करावा. वर गवत व शेण-चिखलाचा थर देऊन झाकावे.
मुरघास तयार व्हायला ४५ ते ६० दिवस लागतात. त्यानंतर थोडे भोक पाडून रोज लागेल तितका मुरघास काढावा.
दुभत्या जनावरांना दररोज १० ते १५ किलो मुरघास द्यावा. तो पोषक असल्याने दूधउत्पादनात वाढ होते.