Neem Ark : पाच टक्के निंबोळी अर्क कसा तयार करायचा?

Team Agrowon

निंबोळ्या बारीक करणे

उन्हाळ्यात निंबोळ्या गोळा करून चांगल्या वाळवून साफ कराव्यात आणि साठवून ठेवाव्यात. साठवलेल्या निंबोळ्या फवारणीच्या एक दिवस अगोदर कुटून बारीक कराव्यात.

Neem Ark | Agrowon

निंबोळ्या भीजवणे

पाच किलो निंबोळी चुरा नऊ लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी रात्रभर भिजत ठेवाव्यात. एक लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा भिजत टाकावा.

Neem Ark | Agrowon

साबणाचे द्रावण

दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ लिटर पाण्यातील निंबोळीचा अर्क पातळ कपड्यातून गाळून घ्यावा. गाळलेल्या अर्कात एक लिटर तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावं. हे मिश्रण एकूण शंभर लिटर होईल एवढं पाणी टाकावं.

Neem Ark | Agrowon

उरलेला चोथा

हा ५ टक्के निंबोळी अर्क फवारणीसाठी तयार होतो. फवारणीसाठी त्याच दिवशी तयार केलेला निंबोळी अर्क वापरावा. उरलेला चोथा जमिनीमध्ये मिसळावा त्याचा खत म्हणून चांगला उपयोग होतो

Neem Ark | Agrowon

वनस्पतीजन्य कीटकनाशक

एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणून निंबोळी अर्काचा वापर करून रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीच्या खर्चात बचत करता येते.

Neem Ark | Agrowon

मित्र किडींचे संवर्धन

रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर टाळून मित्र किडींचे संवर्धन होऊन पर्यावरणाचा समतोल राखता येतो.

Neem Ark | Agrowon

खर्च कमी

गावातला प्रत्येक शतकऱ्याने निंबोळ्या जमा करून कमी खर्चात निंबोळी अर्क तयार करावा.

Neem Ark | Agrowon
Agrowon