Sesame Sowing : कमी दिवसात, कमी खर्चात येणाऱ्या तीळाची कशी लागवड करावी?

Team Agrowon

जमीन

वाळूमिश्रित पोयट्याच्या जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास पिकाची चांगली वाढ होते. त्याचप्रमाणे सुपीक व उत्तम निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत पिकाची वाढ चांगली होते.

Sesame Sowing | Agrowon

पूर्वमशागत

तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे जमीन तयार करताना भुसभुशीत पण टाळूवर थोडीशी टणक राहील अशा पद्धतीने पूर्वमशागत करावी.

Sesame Sowing | Agrowon

पेरणीची वेळ

उन्हाळी तिळासाठी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरणी करता येते.

Sesame Sowing | Agrowon

पेरणीची पद्धत

पेरणीच्या पद्धतीचा थेट परिणाम तिळाच्या उत्पादनावर होतो. पेरणीसाठी उत्तम प्रतीचे ४ ते ५ किलो प्रति हेक्‍टरी बियाणे पुरेसे होते. पेरणी ३० सें.मी. किंवा ४५ सें.मी. अंतरावर पाभरीने करावी.

Sesame Sowing | Agrowon

बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो बियाण्यांस तीन ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा चार ग्रॅम ट्रायकोडर्मा याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

Sesame Sowing | Agrowon

खत व्यवस्थापन

५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्‍टरी जमिनीत शेवटच्या कुळवणीच्या वेळी चांगले मिसळून घ्यावे. पेरणीच्या वेळी हेक्‍टरी २५ किलो नत्र व २५ किलो स्फुरद द्यावे.

Sesame Sowing | Agrowon

आंतरमशागत

उन्हाळी तिळाच्या पेरणीनंतर सात-आठ दिवसांनी नांगे भरून घ्यावेत. उन्हाळी तीळ पेरणीनंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवसांनी पहिली व त्यानंतर आठ दिवसांनंतर दुसरी विरळणी करावी.

Sesame Sowing | Agrowon
Agrowon