Mashroom Production : कमी जागेत, कमी पाण्यात होणारी अळिंबीची लागवड कशी करायची?

Team Agrowon

कमी जागेत, कमी पाण्यात अळिंबीची लागवड करता येत असल्यामुळे व्यापारी तत्त्वावर अळिंबीचे उत्पादन घेता येते. अळिंबीपासून बनलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना चांगली बाजारपेठ उपलब्ध अाहे.

Mashroom Production | Agrowon

व्यापारी तत्त्वावर अळिंबीची लागवड करण्यासाठी गव्हाचे काड किंवा भाताचे काड वापरले जाते. लागवडीच्या दृष्टीने पिकाची काढणी झाल्यास गव्हाचे काड किंवा भाताचे काड पावसात भिजू देऊ नये, ते सुरक्षित ठिकाणी साठवावे.

Mashroom Production | Agrowon

अळिंबी लागवडीचे विविध टप्पे आहेत. प्रथम पाण्यात ‘काड’ भिजवून मग त्याचे निर्जंतुकीकरण करावे.

Mashroom Production | Agrowon

निर्जंतूक केलेले काड प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये थरावर थर देऊन दाबून भरावे. काडाच्या प्रत्येक थरावर धिंगरी अळिंबीचे बी (स्पॉन) पसरावे.

Mashroom Production | Agrowon

सर्व थर भरून झाल्यानंतर पिशवीचे तोंड घट्ट बांधून बंद करुन पिशवीला बाहेरुन छीद्र पाडावेत.

Mashroom Production | Agrowon

काडावर स्पॉनची पूर्ण वाढ २५ अंश सेल्सिअस तापमानात १५ दिवसांत होते. टाचणीच्या टोकाएवढी अळिंबी प्लॅस्टिकच्या पिशवीत दिसू लागल्यास वरील पिशवी ब्लेडने अलगद कापावी व वेगळी करावी. बेड १५ सें.मी. अंतर ठेवून रॅकवर ठेवावेत.

Mashroom Production | Agrowon

दोन किलो वाळलेल्या काडाच्या एका बेडपासून ४५ दिवसांत १.५० ते १.७५ किलो अळिंबीचे उत्पादन मिळते.

Mashroom Production | Agrowon
Agrowon
आणखी पाहा...