Geranium Cultivation : जिरॅनियमची लागवड कशी करावी?

Team Agrowon

जिरॅनियम लागवडीसाठी मध्यम प्रतीची पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणारी सुपीक जमीन निवडावी. हलक्या ते मध्यम जमिनीतही जिरॅनियमची लागवड करता येते.

Geranium Cultivation | Agrowon

गादी वाफे बनवून त्यावर जिरॅनियमच्या रोपांची लागवड केली जाते. फेब्रुवारी ते मार्च आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात जिरॅनियमची रोपे तयार केली जातात.

Geranium Cultivation | Agrowon

नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान मुख्य शेतात जिरॅनियमची लागवड केली जाते. लागवडीसाठी रोपे ४५ ते ६० दिवसांची असावीत.

Geranium Cultivation | Agrowon

लागवडीसाठी रोपे ४५ ते ६० दिवसांची असावीत. रोपांची काडी जेवढी जाड तेवढी ती रोपे चांगली असतात. रोपांची तंतुमय मुळे चांगल्याप्रकारे वाढलेली असावीत.

Geranium Cultivation | Agrowon

रोपांची लागवड ६० बाय ६० सेंटीमीटर किंवा ७५ बाय ६० सेंटीमीटर अंतरावर करावी.

Geranium Cultivation | Agrowon

लागवडीसाठी अलजीरियन, ट्युनिशिया, रीयूनियन, बोर्बन, हेमंती, बिपुली, कुंती, आय. आय. एच. आर. - ८, उटी, नर्मदा, इजिप्शियन आणि सिम-पवन या जाती उपलब्ध आहेत.

Geranium Cultivation | Agrowon

लागवड केल्यानंतर दर चार महिन्यांनी विळ्याच्या साह्याने कापणी करावी लागते. कापणी केल्यानंतर पुन्हा लागवड करण्याची गरज नसते. हेच पीक तीन वर्षापर्यंत चालते.

Geranium Cultivation | Agrowon