Golden Rod : पिवळी डेझी फूलपिकाची लागवड कशी कराल?

Team Agrowon

पिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे. या वनस्पतीचा वापर प्रामुख्याने `फिलर मटेरिअल'' म्हणून करण्यात येतो.

Golden Rod | Agrowon

फुलांचे बुके/गुच्छ तयार करताना पिवळ्या डेझीचा वापर केला जातो. या फुलाला सॉलिडॅगो, गोल्डन रॉड, सोनतुरा असेही म्हणतात.

Golden Rod | Agrowon

पिवळी डेझी लागवडीसाठी मध्यम किंवा हलक्‍या प्रकारातील उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी.

Golden Rod | Agrowon

लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून हेक्‍टरी १५ टन कुजलेले शेणखत मिसळावे.

Golden Rod | Agrowon

लागवडीसाठी तीन मीटर लांब आणि दोन मीटर रुंद आकाराचे सपाट वाफे तयार करावेत किंवा सरी-वरंब्यावरदेखील लागवड करता येते.

Golden Rod | Agrowon

लागवडीनंतर ४० ते ५० दिवसांनी फुले येण्यास सुरवात होते. वर्षभर फुले येत राहतात. डेझीची फुले दांड्यासह काढावीत.

Golden Rod | Agrowon